top of page
Writer's pictureAnn Madhuri Devle

रोटरी क्लब ॲाफ पनवेल सिंफनी तर्फे व्यावसायीक उत्कृष्टता पुरस्कार (Vocational Excellence Awards) सोहळा

शुक्रवार दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी रोटरी क्लब ॲाफ पनवेल सिंफनी तर्फे व्यावसायीक उत्कृष्टता पुरस्कार पनवेल परिसरा मधील दोन उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींना रोटरी कम्यूनिटी सेंटर सेथे देण्यात आला.


आपल्या छोटेखानी व्यवसायाच्या माध्यमातून समाजाभिमुख लोकोपयोगी उत्तम कार्य निष्ठेने करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड होते आणि सिंफनीक्लबने निवडलेल्या व्यक्ती या पुरस्काराचे मानकरी, श्री हानीफ कच्छी आणि श्रीमती पुष्पलताताई देशपांडे, हे खरोखरच आपापल्या क्षेत्रातील उत्तम रत्न आहेत.


श्री हानिफ कच्छी हे आपला पारंपारीक बैलगाडीचे चाकजोड बनविण्याचा व्यवसाय पनवेल येथील बंदरा जवळ राहूनच करतात. ३०० वर्षां पासून कच्छी कुटूंब या व्यवसायात कार्यरत आहे. बंदरात येणाऱ्या जहाजांतील माल वाहून नेणाऱ्या बैलगाड्यांना त्यामुळे मोठी मदत झाली. कालांतराने औद्योगीक क्रांती मुळे व अधीक गतीशील मालवाहू वाहनांनुळे या व्यवसायाची मागणी कमी होत गेली तरी कच्छी कुटूंब या व्यवसायात टिकून राहीले. सध्या श्री हानिफ कच्छी हे एकमेव हा व्यवसाय निष्ठेने करत आहेत. निरनिराळ्या संस्थांनी त्याच्या या कार्याची दखल तर घेतलीच शिवाय त्यांना मपनवेल भुषण हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तसेच श्री जगन्नाथाच्या रथाची चाके बनवण्याचा बहूमानही त्यांनामिळाला आहे.


या पुरस्काराच्या पुढिल मानकरी श्रीमती पुष्पलताताई देशपांडे या पनवेल, पोयंजा आणि अजूबाजूच्या खेडोपाड्यात सुईण मावशी म्हणून प्रसिध्द आहेत. १९५७ मधे परिचारीकेचे शिक्षण घेऊन सरकारी रूग्णालयात पोयंजे येथे त्या रूजू झाल्या. काम करत असताना त्यांनी वेळ काळाची उन पावसाची कसलीही पर्वा नकरता त्या खेडेपाडी, आदिवासी वाडी वस्ती डोंगर पाड्यात चालत तर कधी बैलगाडीने -रात्री अपरात्री हातात कंदिल घेऊन जाऊन बाळंतपणात अडलेल्या स्त्रियांना सुखरूप सोडवलेले आहे. आपल्या ९२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आजवर २५०० हून अधीक बाळंतपणे केली आहेत व त्यांच्या या कार्याच्या यशाचा टक्का १००% आहे.


रो. सिंफनी क्लबने या दोघांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. शाल, श्री फळ, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रोटरी कम्यूनीटी सेंटर येथे रात्री आठ वाजता या कार्यक्रमात प्रेसिडेंट योगीता यांनी मिटींग कॅाल टू ॲार्डर करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे डायरेक्ट व्होकेशनल सर्विसेसचे रोटेरियन श्री. वसंत मालुंजकर प्रमुख पाहूणे म्हणून सपत्नीक हजर हेते तसेच पनवेलचे माजी नगरसेवक रो. श्री. गणेश कडू हे देखील प्रमुख पाहूणे म्हणून लाभले.


पाहूण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलना नंतर ॲन डॅा. शिल्पा वैशंपायन व डॅा. पुनम काथे यांच्या सुमधुर आवाजात सुरेल प्रार्थना व गीते सादर झाली. त्यांना रो. श्रीपाद, रो. किरण, ॲन रूपाली व अन्ना राजेंद्र यांनी कोरसमधे साथ केली. महाराष्ट्र गीताला तर सभागृहातील साऱ्यांनीच सूरात सूर मिसळला. प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते पुरस्कारार्थ्यांना शाल, श्री फळ, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


त्यानंतर पुरस्कारार्थींनी त्यांची मनोगते सादर केली. पुष्पलताताईंच्या वतीने त्यांचा नातू तुषार देशपांडे यांनी मनोगत सादर केले. प्रमुख पाहूण्यांनी आपल्या भाषणात सिंफनी क्लबचे कौतूक केले. या पदावर काम करताना गेल्या सहा महिन्यात आपल्या हस्ते १३५ पुरस्कार दिल्याचे सांगीतले. तर रो. गणेश कडू यांनी राजकीय कार्य करताना आमच्याही नजरेतून सूटलेले असे दोन रत्न तूम्ही निवडलीत या शब्दात कौतूक केले.


रो. शुभद व रो. विनया यांनी काव्यात्मक ढंगात कार्यक्रमाचे खुसखुषीत सुत्रसंचालन केले त्यामुळे कार्यक्रम अधीक बहारदार झाला.


सेक्रेटरी मिनल यांनी आजवरची उच्चांकी उपस्थिती नोंदवली. सिंफनी क्लबचे व्होकेशनल सर्विस डायरेक्टर रो. उमेश लाड यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.


मान्यवरांसोबत रोटेरीयन, ॲन यांनी फोटो काढले आणि अतीशय सुनियोजीत, शिस्तबद्ध , आखिव रेखिव सूंदर सोहळ्याचे चित्र कायमस्वरूपी आपल्या मनात साठवून मंडळी सभागृहा बाहेर पडली.






37 views0 comments

Recent Posts

See All

Σχόλια


bottom of page