top of page
Writer's pictureRtn Vinaya Walimbe

पावसाळी सहल आणि चार्टर डे

आम्ही रोटरी क्लब ऑफ पनवेल सिंफनी कुटुंबीय प्रत्येक वर्षी पावसाळ्यात ट्रीपला जात असतो. सर्वजण मिळून पावसात भिजतो नाचतो, गातो . पावसाचा मनमुराद आनंद लुटत सहलीचा दिवस साजरा करतो. यावर्षी आम्ही पनवेल जवळच साधारण 17/18 किलोमीटर वर असणाऱ्या एका नैसर्गिक ठिकाणी जाण्याचे ठरवले. आमच्या प्रेसिडेंट ने स्वप्नपूर्ती नावाचे फार्महाऊस, सतीचीवाडी, मालदूंगे येथे सगळ्यांचे बुकिंग केले होते. पावसाळी सहल आणि चार्टर डे असे दोन्ही तिकडेच साजरा करण्याचे ठरले.


प्रवासाचा दिवस उजाडला. सुंदर निसर्गरम्य मार्ग असल्याने आम्ही छान पावसाच्या सरींचा व निसर्गाचा अनुभव घेत मजेत गाणी गुणगुणत रिसॉर्ट वर पोहोचलो.


हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत असलेलं रिसॉर्ट बघून आम्ही सगळे खुश झालो. जवळच असलेला स्वच्छ पाण्याचा स्विमिंग पूल आम्हाला खुणवत होता. त्याचबरोबर रिसॉर्ट च्या समोर असलेला खळखळ वाहणारा ओढा डोळ्यांचे पारणे फिटवत होता.. चहूबाजूंनी निसर्ग सौंदर्याचा साक्षात्कारच आम्हाला घडत होता. आम्ही लगेच सेल्फी व कॅमेरा ने फोटोज् काढले तसेच व्हिडिओज देखील बनवले. विशेष म्हणजे जयदीप ने सोबत आणलेल्या drone ने धमाल उडवून दिली...प्रत्येक जण कुतूहलाने पाहत होता...आणि drone ची गंमत लुटत होते.


पाण्यात उतरण्याची घाई तर झाली होती पण पोटात कावळे ओरडू लागले आणि मिसळ पाव खुणवत होता. अर्थातच ह्याचे नियोजन Admin director प्रसाद ह्यांनी आधीच करून ठेवले होते. सगळ्यांनी त्यावर मस्तपैकी ताव मारला आणि चहा चा आस्वाद घेत पाण्यात उड्या मारल्या. मोक्ष ने बॉल आणला होता. सगळ्या पुरुषमंडळी नी लगेच वॉटर व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली. आम्ही सगळ्या रिल करण्याच्या दृष्टीने पाण्यात वेगवेगळ्या डान्स स्टेप करत होतो.आमचे सगळे डान्स धुमाळ सर आणि उमेशजी मोबाईल वर टिपत होते. स्विमिंग पूल वर मनसोक्त दंगा चालू होता तोच प्रेसिडेंट योगिताने तळलेले व फर्स्ट जंटलमन प्रसाद ने आयोजित केलेले गरमागरम खिमा कटलेट पाण्यात भिजत खाल्ले.


तेव्हड्यात आणखी दोन गाड्या आल्या. ज्यात प्रेसिडेंट इलेक्ट मानसी, साक्षी आणि मित्रपरिवार असा ग्रुप आला. आल्या आल्या साक्षीने मस्त मक्याची कणसे लिंबू मीठ मसाला लावून आणली ज्या वर सगळ्यांनी पोहत पोहत ताव मारला.


मग सगळे रिसॉर्ट समोरील खळ खळ वाहणाऱ्या ओढ्यावर जाण्यास निघालो. उंच डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्याच्या लांब नागमोडी ओढ्यात सगळे मनसोक्त खेळले. drone ने फोटो काढले. चार्टर डे साठी सेक्रेटरी मीनल आणि नीरज ने आणलेला केक कट केला. व्हेज/नॉनव्हेज बिर्याणी आणि साक्षीने केलेले, मानसी आणि रूपाने तळलेले चविष्ट समोसे घेऊनआम्ही जेवणासाठी बसलो. मस्तपैकी जेवण करून झाल्यावर आम्ही cold drink चा आस्वाद घेतला. प्रेसिडेंट ने ट्रीप संपल्याची घोषणा केली तरी शुभद चे फोटो काढणे थांबले नव्हते. सगळ्या जोडप्यांना झोपाळ्यावर बसूवून तिने फोटो काढले. मग परतीचा प्रवास सुरू करणार तोच टॉवर वाडी ची टेकडी चढून वर जाऊअसे प्रेसिडेंट ने सांगितले. डोंगरावरून खळखळ कोसळणारे धबधबे आणि सुंदर हिरवा गार निसर्ग डोळ्यात भरून टेकडीवरून खाली उतरलो. खाली उतरल्यावर अर्धा किलोमीटर गेल्यावर टपरी वरचा गरमा गरम चहा घेतला.



परतीच्या प्रवासात देखील आमचा उत्साह काही कमी झाला नव्हता. गाणी गुणगुणत आणि मज्जा करतच गप्पा टप्पा करतआम्ही घरी पोहचलो. सर्वांच्या मोबाईलमधून आणि कॅमेरामधून काढलेले फोटो कधी माझ्याजवळ येतायेत याचीच उत्सुकता मला लागून राहिली होती. अशी ही पावसाळ्यातील सहल म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता.

26 views0 comments

Recent Posts

See All

Comentarios


bottom of page