श्री सतीश जोशी.. नाव ओळखीचं वाटतंय ना... अहो आहेच ते. ' बाईपण भारी देवा ' या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी चा शांत, सौम्य नवरा आठवा. मंडळी हेच ते सतीश जोशी!! पण ही ओळख करून देण्यापेक्षा त्यांच्या वेगळ्या कलेची वेगळ्या आवडीची ओळख करून द्यायला जास्त आवडेल.
चित्रपट संगीताची प्रचंड आवड आणि गोडी असलेले सतीशजी वेगवेगळे विषय घेऊन , अर्थात संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करतात. उदा...
बाजे पायल छुन छुन
मदन मोहन - एक मीठी कसक
संगीताचा कोहिनुर- नौशाद
एस डी बर्मन - एक अवलीया
आर डी बर्मन - एक चमत्कार
आणि असे बरेच...
रो क्लब ऑफ पनवेल सिंफनी ने 14 जुलै रोजी सतीश जोशी यांचा R D Burman - एक चमत्कार हा कार्यक्रम अयोजिला होता. आर डी चा सांगीतिक प्रवास , त्याची गाणी , त्यामागचे किस्से , गाण्यातील बारकावे , काही आठवणी हे सगळं दृक्श्राव्य माध्यमातून आमच्यासमोर उलगडलं. सतिशजींची अभ्यासू वृत्ती , त्यांचं dedication , त्यांची involvement त्या एका तासात प्रकर्षाने जाणवली.
अमर प्रेम , पडोसन , तिसरी मंजिल , कारवा , यातील काही गाण्यांची झलक दाखवून nostalgia चा अनुभव दिला. कार्यक्रम संपूच नये असं वाटत होतं कारण ' दिल अभी भरा नही ' अशीच सगळ्यांची मनोवस्था झाली होती . ' मी परत येईन ' या बोलीवर कार्यक्रमाची सांगता झाली.
सतीश जोशी यांचा नितांत सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल रो विनया आणि श्री राजेंद्र वाळिंबे यांचे मनःपूर्वक आभार.
Comentarios