सस्नेह नमस्कार,फर्स्ट लेडी होण्याचा मान मिळणे, ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे असे मला वाटते. अध्यक्ष्यांची बायको म्हणजे अर्धांगिनी, त्यामुळे या वर्षात समाजसेवेत आपला अर्धा सहभाग असायलाच हवा असे वाटले. या गोष्टीचा पुरेपूर फायदा मी 2022-23 या वर्षात घेतला, म्हणजे समाजसेवा करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. माझ्या प्रत्येक निर्णयाला क्लबने पुरेपूर साथ दिली . Clinic practice सांभाळून प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणे आणि आपल्याला हव्या तशाप्रकारे प्रत्येक प्रोजेक्ट पूर्णत्वास नेणे खरंच खूप कठीण होते. थोडक्यात तारेवरची कसरत होती. पण म्हणतात ना... इच्छा असली की मार्ग सापडतोच. महत्वाचे म्हणजे सद्गुरूचे आणि वडील मंडळींचे आशीर्वाद भक्कम पाठीशी होते. म्हणूनच अध्यक्ष आणि मी आपल्या क्लबला उंचीवर नेऊ शकलो. वर्षभरातल्या अनुभवावरून एकच सांगावेसे वाटते की, ज्यांना जसं शक्य असेल तसा वेळ आपल्या क्लबसाठी देत जा. आपल्या प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करावेसे वाटते आणि म्हणूनच आज आपण इथे आहोत. अजूनही काही मेडिकल प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही याची खंत वाटते. वर्षभर आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानते. पुढच्या वर्षीच्या अध्यक्ष आणि सचिव आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देते.
top of page
bottom of page
Comments