Rotary club of panvel symphony तर्फे 9 डिसेंबर रोजी " English School " च्या विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. विषय होतं " Mental Strength". डॉ विशाल गणार हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. अतिशय सरळ सोप्या भाषेत या विषयाच गांभीर्य समजावून सांगितलं.
बरेच वेळा एक पालक म्हणून मुलांना समजून घेण्यात आपण कमी पडतो. अश्या वेळेस आपण कसं वागायला हवं जेणेकरून आपल्या मुलांना आपल्याबद्दल विश्वास वाटेल आणि मुलांना पण जबाबदारीची जाणीव होईल हे डॉक्टरांनी काही उदाहरणे देऊन स्पष्ट केलं. मोबाईल चा अतिरेक वापर कसा घातक ठरत आहे ही आजच्या पालकांची चिंता आहे. यावर डॉक्टरांनी काही tips दिल्या. याची सुरवात मुलांच्या पालकांपासूनच व्हायला हवी यावर त्यांनी विशेष जोर दिला.
प्रत्येक मूल वेगळं आणि unique आहे असं डॉक्टर म्हणतात. मला वाटतं हेच वाक्य प्रत्येक आई वडिलांनी समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून पालक आणि मुलांमधील नातं अधिक सशक्त आणि सुदृढ होण्यास मदत होईल आणि त्यामुळे Mental Strength ची जडन घडण चांगल्याप्रकारे होण्यास मदतच होईल.
शाळेतील शिक्षक, रोटरी क्लब सिमफोनी च्या प्रे. योगिता, सेक्रे. मीनल, विशेष अतिथी डॉ कोलथे कार्यक्रमाला उपस्थित होते.
Comments