top of page
Writer's pictureRtn Asmita Acharya

Hope, Happiness and Fun

Rotary international च्या theme नुसार नोव्हेंबर महिना हा ' Foundation month ' म्हणून ओळखला जातो. या theme ला अनुसरून आणि POLIO FUND ला मदत या उद्देशाने President योगिताने ' Hope, Happiness and Fun ' हा आगळावेगळा कार्यक्रम 24 नोव्हेंबरच्या weekly meeting दरम्यान आयोजित केला होता.


आपल्या घरात काही भेटवस्तू आलेल्या असतात किंवा आपण स्वतः सुद्धा कुठे गेलो की काही वस्तू खरेदी करतो. पण बऱ्याच वेळा या अशा वस्तू घरातच कुठेतरी बाजूला राहून जातात आणि त्यांचे काय करावे हे आपल्याला समजत नाही किंवा बऱ्याचदा त्या विस्मरणात पण गेलेल्या असतात. तर अशा वस्तूंचा लिलाव करून त्यातून उभा राहिलेला निधी Polio Fund साठी क्लब तर्फे द्यायचा अशी थोडक्यात या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे ऐकल्यानंतर नक्की याला कसा प्रतिसाद मिळेल असा प्रश्न बहुदा सगळ्यांच्या मनात आला असेल.


रो. प्रशांत पन्हाळे आणि Ann वृषाली यांनी या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी स्वीकारली. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घरातील अशा वस्तूंचे फोटो त्यांना त्यांच्या वैयक्तिक WhatsApp वर पाठवले. प्रत्येक वस्तूची base price ( minimum ₹50/- , maximum ₹1000/-) त्यांनी ठरवली. प्रत्यक्ष मीटिंगच्या दिवशी सर्व वस्तू त्या दोघांकडे जमा केल्या गेल्या. सर्व वस्तू चांगल्या condition मधे आणि स्वच्छ असाव्यात अशी अट होती.


मीटिंगच्या सुरवातीला प्रे. योगिताने उपनिषदामधील गोष्टीचा संदर्भ देऊन दानाचे महत्त्व सांगितले आणि नंतर कार्यक्रमाची सर्व सूत्र प्रशांत आणि वृषाली यांच्याकडे सोपवली. दोघांची जय्यत तयारी होती. आपण सिनेमा मधे बघतो त्याप्रमाणे प्रत्येकाला नंबर लिहिलेले flag वाटण्यात आले. छोटी कौशिकी त्यांना हौशीने सगळी मदत करत होती. इतक्या वस्तू समोर असून देखील कुठली वस्तू कोणी आणली आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण जर वस्तू नाही विकल्या गेल्या तर काय अशी एक शंका कुठेतरी मनात येत होती. पण थोड्याच वेळात ती साफ खोटी ठरली. एकेक वस्तू घेणारे 2-3 जण होते आणि मग किंमत हळूहळू 50/- रुपयांनी वाढत होती. तरी देखील सर्व वस्तू बघता बघता विकल्या गेल्या. काहींनी donation म्हणून स्वतःची काही रक्कम जाहीर केली आणि तासाभरात दहा हजाराचा निधी जमला सुद्धा.


प्रत्येकाने या खेळाचा मनमुराद आनंद घेतला आणि तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत देखील होता.

कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा मात्र

' देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे '

या विं दा. करंदीकर यांच्या ' घेता ' या कवितेच्या ओळी माझ्या मनात रुंजी घालत होत्या

37 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page